संस्थेबद्दल
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही एक महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून या संस्थेची स्थापना सन १९६२ मध्ये केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत करण्यात आली. आदिवासी विषयावरील विविध बाबींवर संशोधन करण्यासाठी देशातील काही आदिवासी बहुल राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थेची स्थापना करताना संस्थेचे खालील उदिष्टये निश्चित करुन देण्यात आली होती. संस्थेची उदिष्टये व कार्य केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आदिवासी जीवनावर झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करणे आदिवासी जीवन व विकास यांचेशी संबधित विषयावर संशोधन करणे. आदिवासी विकास विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचारीवृंदाकरिता सेवांतर्गत प्रशिक्षण तसेच आदिवासी विद्यार्थ्याकरिता सेवापूर्व प्रशिक्षण राबविणे. आदिवासीकरिता विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे आदिवसी कला व संस्कृती जतन करण्याकरिता आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय चालविणे, हस्तकला प्रदर्शनाचे विविध शहरी भागात आयोजित करणे तसेच आदिवासी जीवनावर लघुपटाची निर्मिती करणे. महाराष्ट्र राज्यात क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही गेली ५० वर्षे आदिवासी विषयाबाबत अभ्यास करणारी तसेच आदिवासी या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणारी राज्यातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेच्या कामाची नोंद घेऊन केंद्र शासनाने या संस्थेला देशातील सर्व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकरिता नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केलेली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा २०१३ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला व या सुवर्ण महोत्सवाचे उदघाटन तत्कालीन राष्ट्रपती मा.श्री.प्रणब मुखर्जी यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी या आदिवासी सशोधन तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनास सल्ला व मार्गदर्शन करण्याच्या अनुषगांगने संस्थेच्या मूळ उदिष्टयांची व्याप्ती वाढवून शासन निर्णय २४ डिसेंबर २०१३ नुसार उदिष्टये निश्चित करुन या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला.
निकष
योजनेचे फायदे
- विद्यार्थ्यांना दरमहा ₹31,000/- मिळतात
- आकस्मिक खर्च रु. 25,000/- वार्षिक
- दिव्यांग उमेदवारांना रु. 2000/- सहाय्य अनुदान (अंशक 10 उमेदवार)
पात्रता निकष
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- सदर योजनेचा लाभ घेणेसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी असेल.
अपडेट्स
- Notification for all the students of PhD Fellowship.(19-Sept-2025)
- 4th Selection Order – Scheduled Tribe Research Fellowship (PhD) 2024-25 (11-Sept-2025)
- PhD Fellowship Notification for Year 2025-26 (02 September 2025)
- 3rd Selection Order – Scheduled Tribe Research Fellowship (PhD) 2024-25 (13-Aug-2025)
- Notification for STRF - (2025 - 2026)
नोंदणी कशी करावी?
स्टेप 1
साइटवर आपले लॉगिन तयार करा किंवा साइन इन करा
स्टेप 2
अर्ज भरा
स्टेप 3
प्रशासकाद्वारे निवड मिळवा
स्टेप 4
पीएचडीचे सामील पत्र अपलोड करा
स्टेप 5
तुमची फेलोशिप मिळवा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न